कसब्यात कॉँग्रेसमध्ये बंडखोरी; बाळासाहेब दाभेकर यांचा अर्ज दाखल
पुणे – कार्यकर्त्यांचा जल्लोष, बाळासाहेब दाभेकर तुम आगे बढो चा जोरदार घोषणाबाजीत पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी आज मंगळवारी कसबा विधानसभा मतदारसंघाच्याब निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
दाभेकर काँग्रेसकडून इच्छुक होते परंतू पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला
आज सकाळी नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरातील गणरायाच्या मूर्ती चे दर्शन घेतले त्यानंतर ते सजवलेल्या फुलांचा जीपमध्ये बसून कार्यकर्त्यांच्याबरोबर दुचाकी वाहनांच्या रॅलीत सहभागी झाले ही रॅली नंतर केसरीवादा येथे आली केसरीवाडयातील श्रींची दर्शन घेतले त्यानंतर शैलेश टिळक यांची सदिच्छा भेट घेतली यानंतर ही रॅली केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक मार्गे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्रींच्या मुर्तींची आरती केली यानंतर रॅलीने ते शिवाजी रस्त्याने गणपती कला क्रिडा रंगमंचाच्या हालमध्ये आले
निवडणूक निर्णय अधिकारी देवकाते, आशीष महादळकर यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केला
