Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

पीएमडीटीए-आयकॉन-सोलींको ब्रॉझ लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2023 स्पर्धेत अधिराज दुधाणे, अयुश्री तरंगे, सक्षम भन्साळी, सारा फेंगसे यांना विजेतेपद

पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयकॉन व सोलींको यांच्या संलग्नतेने पार पडलेल्या 12 व 14 वर्षाखालील  मुले व मुलींच्या पीएमडीटीए- साळवी अहेर टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेत अंतिम फेरीत अधिराज दुधाणे, अयुश्री तरंगे, सक्षम भन्साळी व  सारा फेंगसे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
साळवी अहेर टेनिस अकादमी, सांगवी येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात दुस-या मानांकीत अधिराज दुधाणे याने अव्वल मानांकीत तनिश पाटीलचा 4-1, 4-1 असा एकतर्फी लढतीत पराभव करत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात दुस-या मानांकीत अयुश्री तरंगेने  प्रार्थना खेडकर 7-5, 8-6 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 
 
14 वर्षाखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकीत सक्षम भन्साळीने दुस-या मानांकीत स्वर्णिम येवलेकरचा 0-4, 4-3, 4-0 असा तर मुलींच्या गटात दुस-या मानांकीत सारा फेंगसेने प्रार्थना खेडकरचा 4-1, 4-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
 
स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक विशाल साळवी, योगेश अहेर, स्पर्धा सुपरवायझर सरदार सिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  विशाल मेहता व अमोल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
12 वर्षाखालील मुले- अधिराज दुधाणे(2) वि.वि तनिश पाटील(1) 4-1, 4-1
मुली- अयुश्री तरंगे(2) वि.वि प्रार्थना खेडकर 7-5, 8-6
 
14 वर्षाखालील मुले- सक्षम भन्साळी(1) वि.वि स्वर्णिम येवलेकर(2) 0-4, 4-3, 4-0
मुले-  सारा फेंगसे(2) वि.वि प्रार्थना खेडकर 4-1, 4-2

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading