पाचव्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, एमडब्ल्युटीए अ संघात विजेतेपदाची लढत
पुणे : मुकुंद जोशी आणि डॉ.अमित पाटणकर यांच्या वतीने आयोजित व नंदन बाळ टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या सहकार्याने होत असलेल्या पाचव्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत डेक्कन चार्जर्स संघाने एफसी जीएनआर संघाचा तर एमडब्ल्युटीए अ संघाने टेनिसनट रॉजर संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुकुंद जोशी, डॉ. जयदीप दाते, अजित साईल, मदन गोखले, आशिष पुंगलिया व चिराग शहा यांच्या विजयी कामगिरीच्यासह डेक्कन चार्जर्स संघाने एफसी जीएनआर संघाचा 22-14 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत अतितटीच्या झालेल्या सामन्यात एमडब्ल्युटीए अ संघाने टेनिसनट रॉजर संघाचा 18-17 असा केवळ एका गुणाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. राजेश मंकणी, सुमंत पॉल, मंदार वाकणकर, सिद्धार्थ बस्नेत, विवेक खडगे व सुमंत पॉल यांनी विजयी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी
डेक्कन चार्जर्स वि.वि एफसी जीएनआर 22-14
100 अधिक: मुकुंद जोशी / डॉ. जयदीप दाते वि.वि पंकज यादव / डॉ. मनोज देशपांडे 6-3
90 अधिक: अजित साईल/मदन गोखले वि.वि पुष्कर पेशवा/आदित्य अभ्यंकर 6-1
खूला गट 1: मुकुंद जोशी/यश चावडा पराभूत वि संग्राम चाफेकर/वैभव अवघडे 4-6

खूला गट 2: आशिष पुंगलिया / चिराग शहा वि.वि गणेश देवखिले/शांभवी नाडकर्णी 6-4
एमडब्ल्युटीए अ वि.वि टेनिसनट रॉजर 18-17
100 अधिक: राजेश मंकणी / सुमंत पॉल पराभूत वि संदीप बेलुडी / राजेश मित्तल 5-6
90 अधिक: जयदीप वाकणकर/आशिष मणियार पराभूत वि सुनील लुल्ला/जॉय बॅनर्जी 1-6
खूला गट 1: मंदार वाकणकर / सिद्धार्थ बस्नेत वि.वि संदीप बेलुडी / रवी कोठारी 6-3
खूला गट 2: विवेक खडगे / सुमंत पॉल वि.वि नितीन सावंत / व्यंकटेश आचार्य 6-2