कसब्यात ब्राह्मण समाजाची बॅनरबाजीतून नाराजी व्यक्त ; भाजपला फटका बसणार?
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला मोठी कसरत करावी लागली. टिळक कुटुंबातील इच्छुकांचा पत्ता कट करण्यात आल्यानं या निवडणूकीत ब्राम्हण समाजाची नाराजी मतांतून दिसून येईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, कसब्यात हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का? असा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत लागले आहेत. त्यामुळे भाजपविरोधातील वातावरण तापलं असल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील शनिवारवाड्या जवळ एका जागरूक मतदाराने हे बॅनर्स लावल्याने खळबळ उडाली आहे
