विख्यात उद्योजक अनुभव दुबे यांचे स्टार्ट अप विषयी बहुमुल्य मार्गदर्शन
पुणे : शनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरने उद्योग क्षेत्रातील कारकिर्दीने अपाली खास ओळख बनविणार्या अनुभव दुबे यांच्या एका खास चर्चासत्राचे आयोजन केले होते , स्टार्ट अप विषयी मार्गदर्शन करणारा हा एक खास कार्यक्रम होता. “स्टार्ट-अप सस्टेन, सक्सीड -लर्न फॉर्म एक्सपर्ट” हा कार्यक्रम वन लाउंज, कोरेगाव पार्क येथे नुकताच संपन्न झाला. ज्याला उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
भारतातील कुऱ्हाड-मॅन अशी ओळख असलेल्या अनुभव दुबे यांनी यावेळी अनेक प्रेरणादायी विचार उपस्थितांसोबत शेअर केले. २२ वर्षांच्या एका सामान्य विद्यार्थ्यापासून भारतातील ४२०+ हून अधिक आउटलेटसह भारतातील सर्वात प्रभावशाली उद्योजक बनण्यापर्यंतचा त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल यावेळी ते बोलले. आपल्या मार्गात आलेल्या सर्व अडथळ्यांवर आणि अडचणींवर त्यांनी कशी मात केली याचे त्यांनी सविस्तर वर्णन केले जे की अत्यंत प्रेरणादायी होते. यामुळे उपस्थितांना आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडूनही नेहमी योग्य , अनोखी गोष्ट करण्यासाठी प्रेरणा, उद्देश आणि प्रोत्साहन मिळाले.
रात्री आठच्या सुमारास कार्यक्रमास सुरुवात झाली. पाहुण्यांच्या आगमनानंतर एनआरएआय पुणे चॅप्टरचे ट्रेजरर निकी रामनानी यांनी स्वागत सत्र संपन्न केले. स्वागतानंतर ताल प्रोजेक्टचा एक अप्रतिम परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला होता. यानंतर डॉटपे एंटरप्राइझ सेल्सचे प्रमुख ललित आहुजा यांनी हे सत्र पुढे नेले आणि ब्रँड बद्दल माहिती दिली. सादरीकरणानंतरच्या मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली जहागीरदार यांनी केले. अनुभव दुबे यांच्यासोबतच्या एका संक्षिप्त प्रश्नोत्तराच्या सत्राने प्रेक्षकांना त्यांच्या जीवनकथेची झलक पहावयास मिळाली. या सत्रानंतर एक रॅपिड-फायर राउंड झाला ज्यामुळे उपस्थित शेवटपर्यंत कार्यक्रमाचा आनंद घेताना पहावयास मिळाले. त्यानंतर माईक प्रेक्षकांच्या हातात देण्यात आला आणि त्यांना दुबे यांच्या जीवनाबद्दल थेट प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली जी सर्व उपस्थितांसाठी मोलाची शिकवण ठरली. त्यानंतर एनआरएआय पुणे सह-चॅप्टर हेड केविन टेलीस यांनी पाहुणे आणि उपस्थितांचे आभार मानले आणि एका शानदार डिनरने सत्राची सांगता झाली. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लुटला .