Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRASports

Khelo India – सायकलीस्ट पुजा, संज्ञाची पदकाची हॅटट्रिक

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या गुणवंत सायकलीस्ट पुजा दानाेळे आणि संज्ञा पाटीलने आपला वेलाेड्रॅमवरील दबदबा कायम ठेवताना खेलाे इंडिया युथ गेम्समध्ये पदकाची हॅटट्रिक साजरी केली. महाराष्ट्राच्या या दाेन्ही सायकलीस्ट शुक्रवारी पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत.
पुजाने केरीन रेस प्रकारामध्ये कांस्यपदक पटकावले. त्यापाठाेपाठ याच गटामध्ये संज्ञा ही राैप्यपदक विजेती ठरली. यातून पुजाच्या नावे यंदाच्या स्पर्धेत तिसऱ्या पदकाची नाेंद झाली आहे. तिने स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येकी एक सुवर्ण, राैप्य आणि कांस्यपदक आपल्या नावे केले. तसेच काेल्हापूरच्या संज्ञानेही स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्ण, राैप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे. आता पुन्हा पदकाचा बहुमान मिळवण्यासाठी या दाेघींही उत्सुक आहे. येत्या बुधवारपासून जबलपूरमध्ये राेड रेस इव्हेंट हाेणार आहे. यादरम्यान त्यांचा सहभाग आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading