Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ

मुंबई : दहिसरमध्ये महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ झाला आहे. जास्त उंचीच्या मुलींना बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या मुलींनी दहिसरमध्ये आंदोलन सुरू केले आहे. गोंधळ झाल्यामुळे दहिसरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

जास्त उंचीच्या मुलींना देखील बाहेर काढल्याच्या आरोपावरून दहिसरमध्ये महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ झाला आहे. १६२ सेंमी. पेक्षा जास्त उंची असलेल्या मुलींनाही बाहेर काढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. या महिलांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

या महिला उमेदवारांना अडवण्याच्या प्रयत्न सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या भरतीसाठी आलेल्या मुलींवर एम. एच. बी. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही मुली जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading