Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीच केली एबी फॉर्ममध्ये गफलत, सत्यजित तांबेंचा आरोप

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदार सत्यजित तांबेंनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर सत्यजित तांबेंनी निवडणुकीपूर्वीचा आणि प्रचाराबाबतचा संपूर्ण खुलासा केला आहे. यावेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच एबी फॉर्ममध्ये गफलत केल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करणार का?, असा देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.

आम्ही तुमच्याकडे कोरा एबी फॉर्म पाठवून देतो. त्यापद्धतीनं कोणाला निवडणूक लढवायची आहे, तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. हे सगळं झाल्यानंतर निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आल्यानंतर त्या दिवशी सकाळी माझी एच. के. पाटील यांच्याशी चर्चा झाली होती. दोन दिवस आधी म्हणजेच 9 जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून आम्ही प्रदेश कार्यालयाशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, माणूस नागपूरला पाठवा. माझा माणूस 10 तारखेला सकाळी नागपूरला पोहोचला. प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं तिथे तो पोहोचला. 10 जानेवारीला सकाळपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माझा माणूस बसून राहिला. तब्बल 10 तास त्या ठिकाणी बसून राहिला. बसून राहिल्यानंतर नाना पटोलेंचा वडिलांना फोन आला आणि एबी फॉर्म देत असल्याचं सांगितलं. तेव्हा माझा माणूस दोन एबी फॉर्म घेऊन निघाला.

एबी फॉर्म म्हणजे ते काही ग्रामपंचायत निवडणुकीचे एबी फॉर्म नाहीत. त्यामुळे ते सीलबंद पॉकीटमध्ये प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आले. 10 तारखेला संध्याकाळी निघाल्यानंतर तो 11 तारखेला सकाळी पोहोचला. 11 तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली. कारण 12 तारीख शेवट होती. फॉर्मचा सील फोडल्यानंतर ते दोन्ही एबी फॉर्म चुकीचे असल्याचं लक्षात आलं, तसेच ते नाशिक पदवीधर मतदारसंघाचे एबी फॉर्म नसल्याचीही धक्कादायक माहिती समजली. एक औरंगाबाद शिक्षण मतदारसंघाचा एबी फॉर्म आहे आणि दुसरा नागपूर शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म आहे. इतका गहाळपणा प्रदेश कार्यालयाने का केला हा माझा मुद्दा आहे, असं म्हणत सत्यजित तांबेंनी नाना पटोलेंवर जोरदार हल्लाबोल केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading