बिल गेट्स बनले ‘शेफ’; चपाती बनवत घेतला स्वयंपाकाचा आनंद
मुंबई : मऊ, लुसलुशीत अन् गरमागरम चपाती, फुलके किंवा रोटी म्हणजे भारतीय जेवणातील अविभाज्य घटक. फायबरचा उत्कृष्ट स्रोत असलेल्या या गव्हाच्या चपातीची भुरळ आता मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनाही पडली आहे. नुकतेच त्यांनी भारतीय पद्धतीची चपाती बनवली अन् खाली सुद्धा.
त्याच झाल असं की, अमेरिकन शेफ इटन बरनाथ हा नुकताच भारतात येवून गेला. यावेळी त्यांने बिहारमध्ये ‘दीदी की रासोई’ या कॅंटीनमध्ये गव्हाची चपाती काय असते?, ती कशी बनवतात हे जाणून घेतलं व शिकलाही. त्यानंतर आता परत अमेरिकेला गेल्यावर शेफ इटन बरनाथ याने बिल गेट्स यांना आपल्या शोमध्ये बोलावून ही चपाती करून खाऊ घातली. यावेळी बिल गेट्स यांनी देखील चपाती करण्याचा आनंद घेतला व दोघांनीही चपाती – भाजीचा आस्वाद घेतला.
.@BillGates and I had a blast making Indian Roti together. I just got back from Bihar, India where I met wheat farmers whose yields have been increased thanks to new early sowing technologies and women from "Didi Ki Rasoi" canteens who shared their expertise in making Roti. pic.twitter.com/CAb86CgjR3
— Eitan Bernath (@EitanBernath) February 2, 2023
