fbpx

पदवीधरसाठी शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानेच भाजपचा पराभव – संजय गायकवाड

बुलढाणा : राज्यातील नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण आणि अमरावती या पाच राज्यांतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालातून मविआने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत शिंदे फडणवीस सरकारला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर अपक्षाला एक आणि मविआने तीन जागांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. परंतु शिवसेनेतील बंडखोरीमुळे ही निवडणुकही सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. यात अमरावतीमधील निवडणूक जिंकण्यासाठी तर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु अमरावतीमध्ये मविआच्या धीरज लिंगाडे यांच्या दणदणीत विजयामुळे फडणवीसांची खेळी सपशेल अपयशी ठरल्याची दिसतेय. अशात शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानेच भाजपचा अमरावतीत पराभव झाला, असं मोठं विधान संजय गायकवाड यांनी केलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: