fbpx

‘….तुम्ही वरळीतून लढून दाखवा’ आदित्य ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज

मुंबई : मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो की, मी वरळीतून राजीनामा देतो, निवडणूक घ्या आणि बघतो कसे जिंकता तुम्ही, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. आदित्य ठाकरे यांनी आता वरळी मतदारसंघाच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिलं आहे.

‘आज संपूर्ण महाराष्ट्राच चित्र भगव आहे. इंडिया टूडेच्या सर्वे नुसार मविआ ला ३४ जागा लोकसभेत जागा येतील. आम्ही महाराष्ट्रासाठी 80 हजार कोटी गुंतवणूक आणली ह्यांच्या सारखी बोगस नाही आणली. मी चॅलेंज देत आहे निवडणूक घ्या आणि निवडून येऊन दाखवा, असं आव्हानच आदित्य ठाकरेंनी भाजपला केलं.

Leave a Reply

%d bloggers like this: