Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कामकाज पार पाडावे- सचिन ढोले

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणतीही कमतरता राहणार नाही यादृष्टीने पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. नामनिर्देशन भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवावा अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या.

पोलीस प्रशासन आणि सेक्टर अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शीतल वाकडे, शिरीष पोरेडी, निवडणूक सहाय्यक नागेश गायकवाड, वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, निवडणूक कक्ष अधिकारी प्रशांत शिंपी आदी उपस्थित होते.

निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस आणि निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या प्रशासकीय यंत्रणेसमवेत समन्वय राखण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मतदान केंद्रामधील सुविधा, मतदान केंद्राचे साहित्य वाटप, मतदार संघातील संवेदनशील आणि असुरक्षित मतदान केंद्रांची निश्चिती तसेच तेथील सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन, मागील निवडणूकीच्या कालावधीतील नोंदविलेल्या गुन्ह्यांची माहिती घेणे, संवेदनशील मतदार संघांचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मतदान केंद्र, मतदार संख्या यादृष्टीने इतर मतदारसंघाच्या तुलनेत चिंचवड मतदारसंघ सर्वात मोठा आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. यासाठी सर्व बाबींचा विचार करून नियोजन केले जात आहे. पोलीस प्रशासनाने निवडणूक कामकाजासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी त्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करावा अशा सूचनाही श्री. ढोले यांनी यावेळी केल्या.

निवडणूक प्रक्रिया शांततेने आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी यावेळी सांगितले. निवडणूक कामकाजासाठी पोलीस प्रशासन संपूर्ण सज्ज आहे, असेही  डिसले म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading