Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRASports

टेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक

इंदूर : तनिषा कोटेचा हिने चुरशीच्या लढतीत दिल्लीच्या लक्षिता नारंग हिचा ४-२ अशा गेम्सने पराभव केला आणि टेबल टेनिस मधील महिलांच्या गटात विजेतेपद पटकावले. दुहेरीत तिला रौप्य पदक मिळाले होते. मुलांच्या एकेरीत जश मोदी याला कांस्यपदक मिळाले.

तनिषा हिने लक्षिता हिच्यावर ११-४,१४-१२,११-६, ९-११,१०-१२,११-४ असा विजय मिळवला. तिने काउंटर ॲटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. लक्षिता हिने चौथी व पाचवी गेम घेत सामन्यातील उत्कंठा वाढवली तथापि सहाव्या गेम मध्ये तनिषा हिने आपल्या खेळावर नियंत्रण ठेवीत लक्षिताचे आव्हान परतविले आणि सुवर्णपदकावर आपली मोहोर नोंदविली.
मोदी याला कांस्यपदक मिळविताना आदर्श छेत्री याच्याकडून चिवट लढत मिळाली. हा सामना ४-२ असा घेत मोदी याने कांस्यपदक पटकावले. तो पुण्यात सन्मय परांजपे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.‌
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंना ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनील बाब्रस यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading