Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

स्वीडनच्या विद्यार्थ्यांची भारती विद्यापीठाच्या समाजविज्ञान केंद्रास भेट

पुणे: भारती विद्यापीठाचे अभिमत विश्वविद्यालय समाज विज्ञान केंद्र व ऑर्किड स्कुल पुणे यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित स्वीडन इंडिया प्रकल्पाची सुरुवात १९९६ मध्ये भारती अभिमत विद्यापीठात करण्यात आली. तेव्हा पासून आजतागायत भारतातील सामाजिक परंपरा समाजकार्याचा अभ्यास करण्यासाठी स्वीडन देशातील विद्यार्थी हे कोथरुड येथील भारती विद्यापीठाच्या समाजविज्ञान केंद्र येथे आले होते. त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

हा उपक्रम भारत – स्वीडन समन्वयक लक्ष्मी कुमार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. सामाजिक विज्ञान केंद्र व स्वीडन यांच्यात दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम चालू आहे. स्वीडिश सोशल वर्क विदयार्थी आणि त्यांचे भारतीय समकक्ष यांच्यातील परस्परसंवादाला चालना देणे आणि क्रॉस सांस्कृतिकल दृष्टीकोनातून भारतीय समाज आणि सामाजिक कल्याण विकासाची झलक देणे हा प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश आहे. १९९६ पासून दरवर्षी प्रत्येकी २० च्या दोन बॅचमध्ये सरासरी ४० स्वीडिश विद्यार्थ्यांचा एक गट भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ समाजविद्यान केंद्र भेट देत आहे.
विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य आणि इंडियन सोसायटीचे अनेक इनपुट दिले. व्याख्याने, क्षेत्र भेटी ग्रामीण प्रकल्प भेटी, सादरीकरण, कौटुंबिक भेटी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे प्राप्त केले जातात. यावर्षी
स्वीडन -इंडिया प्रकल्पाला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सामाजिक , सांस्कृतिक, संवेदनशीलता आणि
जागतिक सामाजिक कार्य विद्याथ्र्यांसाठी एक प्रमुख कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. असे समाजकार्य विभागाच्या प्रभारी संचालक अनिता मोहिते यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading