Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका – संभाजी भिडे

पुणे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात येण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी जुन्नर येथे शिवप्रतिष्ठान च्या धारकऱ्यांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत केलं आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे, असं मत देखील संभाजी भिडे यांनी मांडले आहे.

अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका. जगाचा बाप हा हिंदुस्थान असून याचे उत्तर सारे देश देतील, असे संभाजी भिडे यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे, असं मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी मांडले आहे. जुन्नर येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांना अश्रृ अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading