Union Budget 2023-24 : नोकरदार व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा; कर प्रणालीत बदल
नवी दिल्ली : आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ -२४ सादर केला. यामध्ये नोकरदार व व्यापाऱ्यांसाठी 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे व्यापारी, उद्योजक आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नव्या आयकर प्रणाली नुसार नोकरदारांसाठी 7.5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. पूर्वी ते 5 लाख रुपये होते. तर व्यापारी वर्गास 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. तसेच टॅक्स स्लॅब हा पाच ऐवजी सहा असणार आहेत. नवीन कर प्रणालीमध्ये 50,000 रुपयांच्या वजावटीचा (स्टँडर्ड डिडक्शन) समावेश करण्यात आला आहे.
नवीन कर प्रणाली नुसार 3 लाख ते 6 लाख रुपयांच्या एकूण उत्पन्नावर पाच टक्के कर आकारला जाईल, तर 6 लाख ते 9 लाख रुपयांवर 10 टक्के, 9 लाख ते 12 लाख रुपयांवर 15 टक्के, 20 टक्के कर आकारला जाईल. 12 लाख ते 15 लाख रुपयांवर टक्के आणि 15 लाख आणि त्याहून अधिक रकमेवर 30 टक्के.
