Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मला अटक होणार आहे जितेंद्र आव्हाडांचा दावा

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awad) हे वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत येत असतात. यावेळी आव्हाड आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कोणत्याही परिस्थितील मला अटक होईल, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केंद्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल. ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत अथवा त्यानंतर काही महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. पण, ही बातमी मिळते तेव्हा आश्चर्य वाटतं,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading