‘हप्पू की उलटन पलटन’ने कॅटची भूमिका साकारण्यासाठी गझल सूदची निवड केली
एण्ड टीव्हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्पू की उलटन पलटन’ गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करत आहे. मालिकेमधील प्रत्येक पात्राने आपली विनोदीशैली व विलक्षण कृत्यांसह प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आणि मालिकेच्या कलाकारांमध्ये नवीन सामील झाली आहे गझल सूद, जी कटोरी सिंग ऊर्फ ‘कॅट’ची भूमिका साकारणार आहे. दरोगा हप्पू सिंग (योगेश त्रिपाठी) व राजेश (कामना पाठक) यांच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारण्याासाठी आश्ना किशोरच्या जागी अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. पंजाबमधील लुधियाना येथील निवासी असलेल्या गझलने यापूर्वी काही लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका व वेब सिरीजमध्ये काम केले आहे आणि ती इंग्रजी सराईतने बोलण्यास संघर्ष करावी लागणारी विलक्षण, पण प्रेमळ व उत्साही मुलीची भूमिका साकारण्यास उत्साहित आहे. ती जे काही म्हणते ते इतर लोकांना समजत नसल्यामुळे तिला त्यांच्या रागाचा सामना करावा लागतो. या मालिकेचा भाग होण्यास उत्साहित असलेली गझल म्हणाली, ‘‘मला या मालिकेचा भाग होण्याचा आनंद होत आहे. ही माझ्या कुटुंबाची देखील आवडती मालिका आहे. मी कॅटची भूमिका पाहण्याचा आनंद घेतला आहे आणि मला स्वत:सारखीच भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने खूपच आनंद झाला आहे. तिला इंग्रजी बोलताना करावा लागणारा संघर्ष पाहून मी अचंबित होते. कॉमेडी ही माझी आवडती शैली आहे, कारण यामधून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे अस्सल मनोरंजन देण्यास मिळते. ही मालिका पूर्वीपासून पाहत आली असल्यामुळे मी नेहमीच पात्रांची प्रशंसा करते. ही मालिका प्रभावीपणे कॉमेडी सादर करते. मी शूटिंगला सुरूवात केली आहे आणि हिमानी शिवपुरी, योगेश त्रिपाठी, कामना पाठक यांसारखे प्रतिभावान कलाकार आसपास असल्याने स्वत:ला खूप धन्य मानते. मी आशा करते की प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल, जी प्रेक्षकांमध्ये अगोदरपासून खूप लोकप्रिय आहे.’’
पहा गझल सूदला कॅटच्या भूमिकेत ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
