fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

‘लैंगिक छळ’ विषयक जागृतीसाठी चर्चासत्राचे आयोजन

पुणे : भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज मधील ‘सोसायटी फॉर ऍडव्हान्सड रिसर्च अँड अनॅलिसिस ऑफ लेबर लॉज’ यांच्या वतीने ‘कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ’ विषयक कायद्यांची माहिती देण्यासाठी चर्चासत्राचे आणि पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. भारती विद्यापीठाच्या विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र पार पडले. ऍडव्होकेट अश्विनी कुलकर्णी,एडव्होकेट सलील श्रुंगारपुरे यांनी मार्गदर्शन केले.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.डॉ.जयश्री खंदारे,निहा खान यांनी संयोजन केले.

तसेच धूत ट्रान्समिशन प्रा.लि.(चाकण) येथे विद्यार्थ्यांची इंडस्ट्री व्हिजिट न्यू लॉ कॉलेज मधील ‘सोसायटी फॉर ऍडव्हान्सड रिसर्च अँड अनॅलिसिस ऑफ लेबर लॉज’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली.डॉ.ज्योती धर्म ,डॉ जयश्री खंदारे, निहा खान यांनी संयोजन केले. उद्योगक्षेत्रात प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading