धायरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस धायरी येथे खडकवासला काँग्रेस च्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.चव्हाण पाटील म्हणाले , बंदुकीच्या गोळीने माणसं मारता येऊ शकतात.पण सत्य कधीही संपविता येऊ शकत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांनी १९४८ साली त्यांची हत्या केली. पण महात्मा गांधींचे विचार आजही देशाच्या कणाकणात जिवंत आहेत.
याप्रसंगी उपस्थित वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य मिलिंद पोकळे, पुणे शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील, धायरी गावचे मा. उपसरपंच गुलाबराव पोकळे, पुणे जिल्हा उपध्यक्ष शंकरराव दांगट, सदबा नाना पोकळे,रघुनाथ यादव,आदी उपस्थित होते.
