Wednesday, August 26, 2026
Latest NewsTECHNOLOGY

मेमरीच्या वाढत्या खर्चामुळे गॅलेक्सी झेड सिरीजच्या किमती वाढण्याची शक्यता

मुंबई : देशातील प्रमुख रिटेलर्सनुसार, सॅमसंगचे नवीन फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ भारतात महाग होण्याची शक्यता आहे. १.२५ लाख ते २.६ लाख रुपयांच्या दरम्यान किमती असलेले हे नवीन सॅमसंग फोल्डेबल्स हिंज डिझाइन, डिस्प्ले, टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेमधील उत्कृष्ट इंजिनिअरिंगसह उद्देशपूर्ण गॅलेक्सी एआयचा मेळ घालत आतापर्यंतचा सर्वात उत्तम फोल्डेबल अनुभव देतात.

अनफोल्ड केल्यावर ४.१ मिमी जाडी असलेला गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात पातळ गॅलेक्सी झेड फोल्ड आहे. दुसरीकडे, गॅलेक्सी झेड फोल्ड८ चे वजन केवळ २०१ ग्रॅम आहे, ज्यामुळे हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात हलका फोल्ड ठरला आहे.

सॅमसंग इंडियानुसार गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ ने भारतात रेकॉर्डब्रेक प्री-ऑर्डर्स मिळवल्या आहेत. या स्मार्टफोन्सच्या लाँचच्या अवघ्या ७२ तासांच्या आत जवळपास २.७१ लाख ग्राहकांनी यांची प्री-ऑर्डर केली आहे. या डिवाईसेसची विक्री या महिन्याच्या सुरुवातीला वेगाने सुरू झाली, पण स्मार्टफोनसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या मेमरी चिप्सच्या अभूतपूर्व मागणीमुळे किमतीत वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांना वाटत आहे.

सॅमसंगने गेल्या महिन्यात सांगितले होते की, ग्राहकांचे हित लक्षात घेऊन ते स्मार्टफोनच्या वाढत्या खर्चाचा भार मोठ्या प्रमाणावर स्वतः सहन करत आहेत. कंपनीने भारतातील गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ च्या ग्राहकांसाठी दीर्घ मुदतीचा झिरो-कॉस्ट ईएमआय देखील सुरू केला आहे.

“इतरांनी (स्पर्धकांनी) केलेल्या किंमतवाढीच्या तुलनेत सॅमसंगची किंमतवाढ ही बऱ्याच अंशी कमी आहे, कारण आम्ही वाढता खर्च स्वतः सोसत आहोत. मार्केट शेअर टिकवून ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आम्ही हे करत नसून, सर्वोत्तम डिवाईस देण्यावर भर देणारी कंपनी म्हणून २०२६ मध्ये आम्ही सोसत असलेला तोटा खूप जास्त आहे,” असे सॅमसंग साउथवेस्ट एशियाचे अध्यक्ष आणि सीईओ जेबी पार्क लंडनमध्ये नवीन गॅलेक्सी फोल्डेबल्सच्या लाँचप्रसंगी म्हणाले.

सॅमसंगने भारतातील आपल्या नवीन गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ या स्मार्टफोनच्या किमती वाढवल्यास नवल वाटणार नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

संशोधन संस्था स्मार्ट अॅनालिटिक्स ग्लोबलनुसार, मेमरीच्या किमतींमधील जागतिक संकटामुळे भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेवर असाच दबाव राहील. बाजारपेठेत आधीपासून विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सच्या किमती वाढतील, तसेच नवीन स्मार्टफोन्स अधिक महागड्या किमतीत लाँच केले जाऊ शकतात, असेही या संशोधन संस्थेने पुढे स्पष्ट केले.

मेमरीचे संकट अधिक गडद होत चालल्याने ग्राहकांनी सणासुदीच्या काळात सूट मिळण्याची वाट पाहण्यापेक्षा आताच स्मार्टफोन आणि लॅपटॉप खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरेल, असे रिटेलर्सनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading