Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

पुण्याच्या डॉ. साहिल देव यांचा समावेश असलेल्या एनएफपीआरसीच्या वतीने संसदेच्या संयुक्त समितीसमोर सादरीकरण

निवडणूक सुधरणांबाबतच्या शिफारशींची करण्यात आली मांडणी

पुणे  : पुण्यातील धोरण संशोधक (पॉलिसी रिसर्चर) म्हणून ओळख असलेल्या डॉ. साहिल देव यांचा समावेश अससेल्या ‘नेशन फर्स्ट पॉलिसी रिसर्च अँड चेंज फाउंडेशन (एनएफपीआरसी)च्या वतीने नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या संसदेच्या संयुक्त समितीसमोर सादरीकरण करण्यात आले. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ (वन नेशन, वन इलेक्शन) या विधेयकासंदर्भात हे सादरीकरण्यात करण्यात आले असून यामध्ये डॉ. देव यांसोबतच एनएफपीआरसीचे अनंत कृष्णा, मोनालिसा नंदा या संशोधकांचा देखील समावेश होता.

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयकाबाबत विविध संबंधित घटकांशी चर्चा करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून या विषयी संसदेच्या संयुक्त समितीची महत्त्वपूर्ण बैठकींची मालिका नुकतीच पार पडली ज्या अंतर्गत संसदेच्या संयुक्त समितीसमोर सादरीकरणे झाली. यामध्ये एनएफपीआरसीच्या वतीने निवडणूक सुधरणांबाबतच्या शिफारशींसंबधी मुद्दे मांडण्यात आले असल्याची माहिती डॉ. देव यांनी दिली. या सादरीकरणावेळी संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी, खासदार प्रियांका गांधी सुप्रिया सुळे, अनुराग ठाकूर, आणि मनीष तिवारी आदी उपस्थित होते.

एनएफपीआरसी फाउंडेशन ही दिल्लीस्थित सार्वजनिक धोरणविषयक संस्था असून पुराव्यांवर आधारित संशोधन, कायदेविषयक सहकार्य आणि धोरणात्मक आखणी यांद्वारे भारताची प्रशासन-रचना बळकट करण्यासाठी संस्था कार्यरत आहे.

उच्च आणि आव्हानात्मक शिक्षणाचे मापदंड आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांचा मेळ साधत संस्था धोरणांच्या संरचनात्मक नियोजनासाठी दीर्घकालीन संशोधन आणि कायदेविषयक व प्रशासकीय गरजांसाठी त्वरित विश्लेषण अशा दोन्ही प्रकारच्या सेवा पुरवते. धोरणाची संकल्पना आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांमधील दरी सांधणे हे संस्थेच्या कार्याचे उद्दिष्ट आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading