Thursday, August 27, 2026
ENTERTAINMENTLatest News

आई तुळजाभवानी’ मालिकेत बालतुळजा आणि हरिची होणार पहिली भेट!

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’मध्ये आता एक अत्यंत रंजक व भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. ब्रह्मास्त्राच्या संकटापासून रक्षण करण्यासाठी देवी तुळजाने बालिकेचे रूप धारण केले असून, दुसरीकडे तुळजाच्या या कृतीने वैकुंठात सद्गदीत झालेल्या श्रीहरींच्या आनंदाश्रूतून एका तेजस्वी बाळकाचा म्हणजेच ‘हरी’चा जन्म झाला आहे. नियतीच्या संकेतानुसार आता महालात बालतुळजा आणि हरी यांची पहिलीवहिली भेट होणार आहे. बहीण-भावाचे हे नाते प्रेक्षकांसाठी अत्यंत खास ठरणार असून त्यांच्यातील गोड खोड्या आणि एकमेकांना दिलेली आव्हाने यापुढील भागात पाहायला मिळतील. पहा, ‘आई तुळजाभवानी’, ‘चातुर्मास पर्व’ दररोज, रात्री ८.५० वा. फक्त कलर्स मराठीवर.

सध्या मालिकेत पाताळदेवीच्या आज्ञेने चेलप्पा आत्याचे रूप घेऊन देवीभक्त सखूला सतत मानसिक त्रास देत आहे. मात्र, बालतुळजेने नागपंचमीची कथा सांगून सखूच्या मनात भक्ती आणि विश्वासाची नवी ज्योत पेटवली आहे. सखूच्या खऱ्या भक्तीवर प्रसन्न होऊन नागराजांनी साक्षात दर्शन दिले, ज्यामुळे चेलप्पाची मायावी शक्ती काही काळासाठी क्षीण झाली आहे. दुसरीकडे शुंभाचे ब्रह्मास्त्र बालिकेच्या रूपावर निष्प्रभ ठरल्याने तिचा डाव पार उधळला गेला आहे. या सर्व घटनेनंतर आता तुळजा आणि हरी एकत्र आल्यामुळे वाड्यात एकीकडे आनंदाचे वातावरण असेल, तर दुसरीकडे हरीच्या खोडकर लीला तुळजेची परीक्षा घेताना दिसतील.

एकंदरीत, बालतुळजा आणि बाळ हरी यांच्या आगमनाने मालिकेत मनोरंजन आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. हरी नक्की कोण आहे आणि त्याचे महालात येण्याचे कारण काय, याचा शोध आता लहान तुळजा कशी घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बहीण-भावाच्या या दिव्य दैवी लीलेच्या खोडकर पर्वाचा आनंद घेण्यासाठी नक्की पाहा ‘आई तुळजा भवानी’, दररोज रात्री ८:५० वाजता फक्त कलर्स मराठीवर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading