Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

डॉ. लक्ष्मण कार्ले यांना ‘विश्वशांतीदूत बाबा आमटे शांतीभूषण’ पुरस्कार जाहीर 

पिंपरी : आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ, महाराष्ट्र पर्यटन व  सांस्कृतीक महोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘विश्वशांतीदूत बाबा आमटे शांतीभूषण’ पुरस्कार यंदा गेली चाळीस वर्षे निःस्वार्थपणे रुग्णसेवा करणारे तळेगाव दाभाडे येथील डॉ. लक्ष्मण कार्ले यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. लक्ष्मण कार्ले हे गरीब, गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार सेवा देण्याचे कार्य करीत आहेत. कोरोना काळात भीतीच्या सावटाखाली असलेल्या गरीब, गरजू रुग्णांच्या घरी जाऊन अल्प दरात औषधोपचार देण्याचे कामही त्यांनी केले आहे. अनेक जीर्ण आजार झालेल्या रुग्णांना बरं करण्याचा त्यांचा हातकंडा आहे. वयाच्या पंचाहत्तरीत त्यांनी केवळ रुग्णसेवा करण्याच्या उद्देशाने खालुंब्रे येथे श्रद्धा हेल्थकेअर दवाखाना सुरू केला, असून त्या माध्यमातून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य सुरू आहे.

दरम्यान, वैद्यकीय सेवेत कायमच गरीब गरजूंना औषधोपचार देण्यात पुढाकार घेल्याने 1993 मध्ये झालेल्या किल्लारी भूकंपानंतर उत्कृष्ट काम केल्याबद्दल, तसेच स्वयंसेवी  रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेऊन 5 लाखापेक्षा अधिक बॅग संकलन व वेगवेगळ्या रक्तपेढीला वितरण केले. सामाजिक बांधिलकीतुन मागील 20 वर्षांपासून मोफत सर्वरोग निदान, औषधोपचार व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करत असतात. आदी कार्याची दखल घेऊन शांतिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading