Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

‘एक्सलन्सी’ शिवाय व्यावसाय क्षेत्रात पर्याय नाही – हनुमंत गायकवाड

 

पुणे : कोणतेही काम करण्यासाठी गुणवत्ता खूप महत्वाची असते. बर, चांगलं किंवा उत्तम असून चालत नाही तर सर्वोत्तमच असणं आवश्यक आहे मग ते कोणतेही क्षेत्र असो. ‘एक्सलन्सी’ शिवाय व्यावसाय क्षेत्रात पर्याय नाही, असा कानमंत्र बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे चेयरमन हनुमंतराव गायकवाड यांनी दिला.

लेखक आकाश गोंदावले लिखित ‘मनी हायवे – बिझनेस के सूत्र, मंत्र और तंत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन बीव्हीजी इंडियाचे लिमिटेड चे चेयरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर हनुमंतराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेते राहूल सोलापूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हनुमंतराव गायकवाड म्हणाले, वडीलांचे निधन झाल्यावर मी शहरात आलो. काम करून शिकलो. अन् नंतर व्यावसाय सुरू केला. आज बीव्हीजीकडे पार्लमेंट, राष्ट्रपती भवन अनेक एअरपोर्टचे कंत्राट आहे. तसेच शेती आणि औषध क्षेत्रातही बीव्हीजी कार्यरत आहे. मी अनेक उद्योग करतो, पण भारताच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. आपण मोठे झालो की आपण आपल्या आसपासच्या लोकांनाही मोठे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारताला महासत्ता होण्यासाठी सगळ्यांचे योगदान गरजेचे आहे.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, जग हे आता खेड जाल आहे. 24 तास तुम्ही कुठेही जाऊ शकता. आपण जसा शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो. तसा आपण काही बाबतीत ब्रिटिशांचा देखील घेतला पाहिजे. 16 शतकात जेव्हा ब्रिटीश भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हत. तरी त्यांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं. तेव्हा त्यांची काय मानसिकता असेल , यांचा विचार आज करणे गरजेचे आहे. कोणताही व्यावसाय हा सोपा नसतो. त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. उद्योजकाने आपल्या क्षमता ओळखून लोकांकडून काम करून घेणे गरजेचे असते.

राहूल सोलापूरकर म्हणाले, जी माणस आयुष्यात केवळ उत्पन्न वाढीसाठी पायवाटा धुंदाळतात त्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून हायवे मिळेल अन् त्यांच्या आयुष्याचा समृद्धी महामार्ग होईल. निर्णय क्षमतेला खूप मोठी किंमत आणि वेळ असते. तो लगेच आणि विचारपूर्वक घेतला की तुमचे भविष्य त्यावर ठरते. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता तेव्हा तुम्ही नकळत त्या दृष्टीने प्रयत्न करत जाता. त्याला प्रामाणिकपणाची जोड असते. मी काय? माझा आवाका काय? माझ्या क्षमता काय ? अन् त्यांचा उपयोग करून मनी हायवे कसा मिळेल, यावर या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानंतर  तुम्हाला तुमच्या निरीक्षणातून, परीक्षणातून पुढील वाटचाल करावी लागेल.

लेखक आकाश गोंदावले म्हणाले, मधमाशी, हनी बी जशी मधासाठी प्रयत्न करत असते, तसा माणूस मनी बी साथी प्रयत्न करत असतो. ही जाणीव माणसाला ज्या क्षणी होते, तो खूप मोठा क्षण असतो. प्रत्येकजण पाऊलवातेने पैसे कमावत असतो. पण पैसे कामवायचा हायवे हा फक्त व्यावसाय आहे. ज्यांना व्यावसाय करायचाय, आर्थिक पाठबळ पाहिजे, नोकरी न सोडता व्यावसाय करायचाय, व्यावसायात आढचण आलीये, व्यावसाय वाढवायचाय आशा सगळ्यांसाठी हे पुस्तक फायदेशीर आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाचपुते यांनी केले. तर आभार हर्षल नलावडे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading