समाजाने आणि महिला संस्थांनी मुलींच्या आत्महत्या व ऑनर किलिंग थांबवण्यासाठी शासनाच्या मदतीने प्रयत्न करणे आवश्यक… डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे: नांदेड व लातूर मध्ये धक्कादायक घटना घडल्या आहेत. यात अनुक्रमे नांदेड येथे ऑनर किलिंग लातूर येथे शिक्षकांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गांभीर्याने लक्ष घातले आहे. यासंदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदन दिले आहे.
नांदेड येथे लिंबगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पिंपरी महिपाल गावात राहणाऱ्या स्वतःच्या कुटुंबाच्या सन्मानातून मुलींची हत्या करण्यात अशा प्रकारची घटना समोर आली आहे. या घटनेच्या मध्ये खेडे गावामधल्या पोलीस पाटलांना ही माहिती पडल्यावरती या बातमीला वाचा फुटलेली आहे. परंतु यामध्ये पोलीस महानिरीक्षक, राज्याचा गृह विभाग, ग्रामविकास विभाग, उच्चा आणि तंत्र शिक्षण विभाग, शिक्षण विभाग यांनी गाव पातळीवर सामाजिक रित्या त्याला चालना देण्याच्या कामांमध्ये समाज कल्याण विकास विभाग आणि महिला बालविकास विभाग यांच्या मदतीने मोहिमा घेणं फार गरजेचे आहे. यासंदर्भामध्ये संबंधितांना डॉ.गोऱ्हे यांनी निवेदन दिले आहे.
त्याचप्रमाणे लातूरमध्ये मानसिक छळ किंवा शाळेकडून, खाजगी शिकवणी चालक यांच्याकडून झालेली वाईट वागणूक याच्यामुळे सुद्धा अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा डॉ.गोऱ्हे यांनी लक्ष घालून निवेदन दिलेले आहे. अशा पद्धतीने बेफिकिरीने वागणारी जी आस्थापने आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे. समाजाने आणि महिला संस्थांनी ग्रामपंचायत व शहरी पातळीवर मुलींच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जसे शेतकरी आत्महत्यासाठी आवश्यकते आहेत त्याचप्रमाणे ही देखील आवश्यकता आहे असे डॉ.गोऱ्हे ह्या म्हणल्या आहेत.
लातूरच्या घटनेत आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावे. शाळेत नोकरी करत शाळेतील विद्यार्थी यांना त्याचे कडे खाजगी ट्युशन लावण्यास शाळेचे व्यवस्थापन यांचेशी संगनमत करून भाग पाडणाऱ्या शिक्षकावर व व्यवस्थापन बॉडीवर कारवाई करण्यात यावी. ज्या शाळा शिक्षकांना खाजगी शिकवणी वर्ग घेण्याच्या परवानग्या देतात अशा शाळांवर कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. या कसे मध्ये तर तात्काळ या शाळेचा परवाना रद्द करण्यात यावा. वारंवार या भागात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी प्रत्येक शाळेत व खाजगी शिकवणी येथे समुपदेशक नेमण्याबाबत शासनाने परिपत्रक काढावे, ही सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी गृहमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हंटल्या आहेत.
