राज्य घटनेचा मानसन्मान करणे हेच खरे प्रजासत्ताक दिनाचे कर्तव्य – भाई नगराळे
पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे उपस्थित होते.
यावेळी भाई नगराळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘‘सर्व माणसे जन्मतः समान दर्जाची आहेत. ती मरेपर्यंत समान दर्जाची राहतील. हे हक्क कायम राहावेत, हाच व्यवस्थेचा व राज्य व्यवस्थेचा अंतीम हेतु असला पाहिजे असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. डॉ बाबासाहेबांनी मांडलेले हे विचार आजच्या काळात समाजात आणि त्यातून अधिक व्यवस्था चालवणाऱ्या लोकात रुजवणे अतिशय गरजेचे झाले आहे. यातूनच लोकशाही बळकट होण्याला बळ मिळेल. या देशामध्ये लोकशाही ही काँग्रेस पक्षामुळेच टिकून आहे. देश उभारणीसाठी आणि देशाचे जगात नावलौकिक वाढवण्यासाठी सदैव पुढे असणाऱ्या या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे. हजारो वर्षाच्या हुकूमशाहीला खिंडार पाडत काँग्रेसने देशाला लोकशाही दिली. ही लोकशाही बनवण्यात जरी योगदान काँग्रेसचे असले तरीही ती टिकवणे ही जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. राज्य घटनेचा मानसन्मान करणे हेच खरे प्रजासत्ताक दिनाचे कर्तव्य आहे. हा महत्वाचा संदेश देऊन सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…’’
यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, सोनाली मारणे, संगीता तिवारी, अनिल सोंडकर, अविनाश बागवे, रफिक शेख, अजित दरेकर, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रजनी त्रिभुवन, नीता रजपूत, ॲड. अनिल कांकरीया, वाल्मिक जगताप, द. स. पोळेकर, शिवानंद हुल्याळकर, हनुमंत पवार, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, राजेंद्र भुतडा, विठ्ठल थोरात, राजू शेख, नंदलाल धिवार, प्रशांत सुरसे, राजेंद्र पडवळ, विकास देशपांडे, फैय्याज शेख, मनोहर गाडेकर, शोभना पण्णीकर, अनुसया गायकवाड, मीरा शिंदे, स्वाती शिंदे, शिलार रतनगिरी, बाळासाहेब अमराळे, मुख्तार शेख, विनोद रणपिसे, भारत पंजाबी, शारदा वीर, वैशाली रेड्डी, ज्योती परदेशी, शिवानी माने आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
