fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्राचीन मंदिरे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजस्थानमधील भीनमालच्या श्री नीलकंठ महादेव मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थिती

जालोर :- राजस्थानमधील जालोर-भीनमाल येथील श्री नीलकंठ महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार तथा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले.

याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त राव मुफतसिंह ओबावत, मंदिर समितीचे पदाधिकारी आदी तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांशी संवादही साधला. हे प्राचीन मंदिर आपल्या सर्वांसाठी सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. अशा श्रद्धास्थानांचे जतन, संवर्धन हे आपले कर्तव्य आहे. तरच पुढच्या पिढीला आपली प्राचीन संस्कृती आणि तिचा वारसा समजून घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

जालोर – भीनमाल येथील हे निलकंठ महादेव मंदिर पंधराशे वर्षे जुने आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्रांगणाचा कायापालट करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना मंदिर समितीने विशेष निमंत्रण दिले होते.

Leave a Reply

%d