fbpx

भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाच्यावतीने नवीन मध्यवर्ती इमारत येथे आयोजित एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक विक्री केंद्राचे उद्धाटन राज्याच्या भाषा संचालक विजया डोनीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, भाषा संचालनालयाचे सह संचालक शरद यादव, अधीक्षक सुनील शिरसाट आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनात प्रशासन वाक्यप्रयोग, संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, वाणिज्य शास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान व तर्कशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन, भुगोलशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, भाषा विज्ञान व वाड्मय विद्या, धातुशास्त्र परिभाषा कोश आदी पुस्तके मांडण्यात आली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: