fbpx

दहाव्या सुहाना कुंदन सीए क्रिकेट लीग स्पर्धेचे २६ जानेवारीपासून आयोजन

पुणे : आयसीएआयच्या पश्‍चिम विभागीय पुणे शाखेच्या वतीने दहाव्या ‘सुहाना कुंदन करंडक’ क्रिकेट लीग २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २६ ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये अष्टपैलू स्पोर्ट्स, शिंदे हायस्कूल मैदान, सहकारनगर येथे रंगणार आहे.

या बाबत अधिक माहिती देताना डब्ल्युआयआरसी ऑफ आयसीएआयचे माजी उपाध्यक्ष सीए सर्वेश जोशी आणि पुणे विभागाचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे यांनी सांगितले की, स्पर्धेला सुहाना व कुंदन यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच या स्पर्धेत पुणे विभागातील ७० हून अधिक नामांकित सीए संस्थांनी सहभाग नोंदवला असून स्पर्धेत एकूण १४ संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

स्पर्धेत बीस्मार्ट, सीए सुपर किंग्स, सीए टायटन्स्, एसपीसीएम, आय कॅन योद्धा, चॅम्प एसके, एसआरपीए, एडीएम वॉरीयर्स, रॉयल्स्, एकत्वम, पी अँड एस इलेव्हन, पीडब्ल्यूसी, एसबीएच आणि फिन प्रो हे १४ संघ विजेतेपदासाठी झुंझणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे हे सलग दहावे वर्ष असून ही स्पर्धा साखळी आणि बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांकासाठी करंडक आणि मेडल्स् देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे.

तसेच या स्पर्धेत पहिल्यांदाच सीए महिला आणि सीए प्रशिक्षणार्थी महिला यांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सामन्यातील विजेत्या संघांनाही पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी चार संघ सहभागी होणार आहेत. या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु-ट्युब वर दाखवण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये सीए योगेश पोद्दार, सीए सचिन पारख, सीए सुमित शहा, सीए अमोल चंगेडिया, सीए अक्षय पुरंदरे, सीए राजेश मेहता, सीए अल्पेश गुजराती, सीए संतोष माने आणि सीए भूषण शहा यांचा समावेश आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: