Saturday, April 25, 2026
Latest NewsSports

नायर नाईट रायडर्स संघाला विजेतेपद !!

लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ चौथी ‌‘लायन्स्‌‍ प्रौढ करंडक‌’ टी-२० क्रिकेट २०२६ स्पर्धा !!


पुणे :  स्पोर्ट्‌‍सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ चौथ्या ‌‘लायन्स्‌‍ प्रौढ करंडक‌’ (४० वर्षावरील) टी-२० क्रिकेट स्पर्धेत हृषीकेश मत्स्ये याने केलेल्या ८१ धावांच्या जोरावर नायर नाईट रायडर्स संघाने गार्गी एज्युकॉन संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि विजेतेपद संपादन केले.

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌‍स ॲकॅडमी मैदानावर झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना गार्गी एज्युकॉनने २० षटकामध्ये १५७ धावा धावफलकावर लावल्या. प्रथमेश देशपांडे (३८ धावा) आणि किरण मेने (३३ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. नायर नाईट रायडर्सकडून कौस्तुभ देशपांडे याने तीन गडी तर, पराग चितळे आणि श्रीपाद भागवत यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य नायर नाईट रायडर्स संघाने १८ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. हृषीकेश मत्स्ये याने ५३ चेंडूत १२ चौकारांसह ८१ धावांची खेळी केली. त्याला श्रीनिवास सरवदे (३२ धावा) आणि विवेक देशमुख (३० धावा) करून उत्तम साथ दिली आणि संघाचे नाव विजेतेपदावर कोरले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण फिजीओ  नेस्ट प्लसचे डॉ. अमोल साळवी आणि स्पर्धेच्या व्यस्थापन समितीच्या सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. स्पोर्ट्‌‍सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी यांनी प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन तर, स्पोर्ट्‌‍सफिल्ड मॅनेजमेंटचे अमित काळे यांनी आभार मानले. विजेत्या नायर नाईट रायडर्स संघाला आणि उपविजेत्या गार्गी एज्युकॉन संघांना करंडक आणि मेडल्स्‌‍ देण्यात आले.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः
गार्गी एज्युकॉनः २० षटकात ९ गडी बाद १५७ धावा (प्रथमेश देशपांडे ३८, किरण मेने ३३, कौस्तुभ देशपांडे ३-२५, पराग चितळे २-२२, श्रीपाद भागवत २-२७) पराभूत वि. नायर नाईट रायडर्सः १८ षटकात ३ गडी बाद १६१ धावा (हृषीकेश मत्स्ये ८१ (५३, १२ चौकार), श्रीनिवास सरवदे ३२, विवेक देशमुख ३०, प्रदीप डोंगरे २-३०); (भागिदारीः पहिल्या गड्यासाठी हृषीकेश आणि श्रीनिवास यांच्या ७९ (५८); दुसऱ्या गड्यासाठी हृषीकेश आणि विवेक यांच्यात ७६ (४७); सामनावीरः हृषीकेश मत्स्ये;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः पराग चितळे (१७ विकेट, नायर नाईट रायडर्स);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः राजु जाधव (२२२ धावा, अनिलदादा फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः जॉन वाघमारे (१३ विकेट, गार्गी एज्युकॉन);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः विवेक देशमुख (४ बाद, नायर नाईट रायडर्स);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकः उमेश काटेकर (१४ विकेट, गार्गी एज्युकॉन);
उदयोन्मुख खेळाडूः हृषीकेश मत्स्ये (२०५ धावा, नायर नाईट रायडर्स);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading