fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नृत्यांगना गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करा – न्यायालय

सातारा : आपल्या  सौंदर्याने तरुणाईला भूरळ घालणारी गौतमी पाटील आता मोठ्या अडचणीत सापडली आहे. कोर्टाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गौतमी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे. आपल्या डान्समध्ये ती अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप प्रतिभा शेलार यांनी करत तक्रार दाखल केली होती.त्यावर आता सातारा कोर्टाने आदेश दिले आहेत.

गैतमीच्या नृत्यावर अक्षेप घेत मृणाल कुलकर्णी यांनी देखील गौतमी विरोधात साताऱ्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांनी दु:ख आणि खंत देखील व्यक्त केली होती. कलावंताने आपली मर्यादा राखली पाहिजे. लावणीकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टीकोन फार वेगळा आहे. मात्र जर कोणी अशा पद्धतीने कृत्य करत असेल तर दुर्दैवाने एका कलावंताविरोधात तक्रार दाखल करावी लागते, असे मृणाल यांनी म्हटलं होतं.गौतमीने काही वेळ संस्कृती जपली मात्र नंतर पुन्हा एकदा तिच्या कार्य्रमांमध्ये अश्लील हावभाव ती करत आहे, असा आरोप मृणाल यांनी केला. तसेच पुन्हा एकदा या बाबद तक्रार दाखल केली. सध्या गौतमीच्या कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता सातारा कोर्टाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

%d