fbpx

Union Budget 2023-24 : शिक्षणाचे डिजिटायझेशन आणि आंतरराष्ट्रीयीकरण यावर भर द्यावा

– जीआयआयएस इंडियाच्‍या कार्यसंचालनांचे संचालक राजीव बंसल

पुणे : २०२३ च्या अर्थसंकल्पात शिक्षणाचे डिजिटायझेशन आणि आंतरराष्ट्रीयीकरण यावर भर दिला पाहिजे. स्मार्ट क्लासरूम, आधुनिक अध्यापन तंत्र आणि ऑनलाइन शिक्षण यांसारख्या संकल्पना आघाडीवर असायला हव्यात. सार्वजनिक ग्रंथालये, जागतिक दर्जाच्या संशोधन सुविधा व व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांच्या उभारणीसाठी सरकारने अधिक निधी आणि मोठा पाठिंबा दिला पाहिजे, अशी अपेक्षा ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यसंचालनांचे संचालक राजीव बंसल यांनी व्यक्त केली आहे.

येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर बंसल यांनी आपल्या आपेक्षा व्यक्त केल्या.  

राजीव बंसल म्हणाले, शाळा व महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम हा कौशल्यावर आधारित बनवला गेला पाहिजे, ज्यामुळे रोजगार मिळेल आणि चांगल्या शैक्षणिक परिणामांसाठी शिक्षणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे. सरकारने इंटरनेट कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि परवडणारे ५जी डिवाईसेस उपलब्‍ध होण्‍यासाठी विशेष बजेटची तरतूद करावी.

शेवटी, शैक्षणिक कर्जे आणि शिष्यवृत्ती अधिक सुलभ व्हायला हवी, ज्‍यामुळे शिक्षण अधिक सर्वसमावेशक होईल आणि आर्थिक किंवा सामाजिक अडथळ्यांची पर्वा न करता पात्र उमेदवारांना प्रवेश मळू शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: