fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

शंभुराज देसाई, रामदास तडस, श्रीरंग बारणे, इम्तियाज जलील यांना युवा संसदेचे पुरस्कार

महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते होणार संसदेचे उद््घाटन ; जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्तर्फे आयोजन

पुणे : युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये सहाव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे दिनांक २७ व २८ जानेवारी रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. संसदेचे उद््घाटन शुक्रवार, दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव उपस्थित होते

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई, खासदार रामदास तडस, श्रीरंग बारणे, इम्तियाज जलील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार संजय रायमुळकर, राजेश पाडवी, सुनिल शेळके, आदिती तटकरे, शहाजीबापू पाटील, भरत गोगावले, निलेश लंके, नगरसेवक वसंत मोरे, श्रीनाथ भिमाले, सरपंच सुनिल जाधवर, रंजना गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील-ठाकरे, संजय गिराण, पत्रकार कमलेश सुतार यांना आदर्श मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शाल, मानचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

शुक्रवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता उद््घाटनप्रसंगी सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत याविषयावर मान्यवर विचार व्यक्त करणार आहेत. दुपारी ३ वाजता मिडीयाचा खरा मालक कोण? याविषयावर वरिष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी, विलास बडे, संजय आवटे आदी मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.

शनिवारी (दि.२८) सकाळी १० वाजता आयडीया आॅफ इंडिया याविषयावर आमदार गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे तरुणाईशी संवाद साधतील. तर, दुपारी १२ वाजता अभिव्यक्ती स्वातंत्र-अतिरेक? गळचेपी? याविषयावर गणराज्य संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा अंधारे, आमदार अमोल मिटकरी आदी मान्यवर संवाद साधणार आहेत.

संसदेचा समारोप दुपारी ३ वाजता होणार असून माजी आमदार उल्हास पवार, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. संसदेकरीता देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून माजी खासदार राजू शेट्टी हे आयोजन समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर सुषमा अंधारे, राजेश पांडे, संजय आवटे, मेघराज भोसले, राहुल कराड, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अ‍ॅड.शार्दुल जाधवर हे कार्यकारणीमध्ये आहेत.

महाराष्ट्र व गोवा येथून सुमारे १५०० विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नेहरु युवा केंद्र, लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. पुणे, सोलापूर, अकोला, कोल्हापूर, मराठवाडा, कोकण यांसह विविध भागांतून विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये येणार आहेत. संसदेच्या माध्यमातून युवकांनी राजकारण आणि समाजकारणातील दिग्गजांसोबत संवाद साधावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. संसदेकरीता प्रवेश विनामूल्य आहे, तरी तरुणाईने मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading