fbpx

ट्रूस्पेस-पीएनजी ज्वेलर्स पुणे जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत अन्वी हिंगे, इरा बोहरा, निवान अगरवाल, अद्विक अग्रवाल यांना विजेतेपद 

पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित ट्रूस्पेस-पीएनजी ज्वेलर्स पुणे जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत अन्वी हिंगे, इरा बोहरा, निवान अगरवाल, अद्विक अग्रवाल या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
सिम्बायोसिस स्कुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 7वर्षाखालील मुलींच्या गटात राऊंड रॉबिनच्या तिसऱ्या फेरीत अन्वी हिंगेने तीन गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, डेलिया खैरनार हिने 2गुणांसह दुसरा आणि इरा जोशीने 1गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. मुलांच्या गटात निवान अगरवालने 6 गुणांसह विजेतेपद मिळविले. तर गोरांक्ष खंडेलवाल आणि हियान रेड्डी यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
9वर्षाखालील मुलींच्या गटात सहाव्या फेरीअखेर इरा बोहरा हिने 5गुणांसह अव्वल स्थान पटकावत विजेतेपदाचा मान पटकावला. तर निधी खिंवसराने दुसरा तर, मिहिका बोलेने तिसरा क्रमांक पटकावला. मुलांच्या गटात आठव्या फेरी अखेर अद्विक अग्रवालने 6.5गुण मिळवत प्रथम क्रमांकासह विजेतेपद पटकावले. तर क्षितीज प्रसाद आणि कविश लिमये यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यांना करंडक, 1500रूपये तर, उपविजेत्या खेळाडूंना करंडक 1000रूपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमसीएचे माजी सहसचिव व बँक ऑफ महाराष्ट्रचे(निवृत्त) सरव्यवस्थापक अनिल राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे सहसचिव शेखर जोरी, पीडीसीसीचे मानद सचिव डॉ. संजय करवडे, पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, चीफ आरबिटर विनीता क्षोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 7वर्षाखालील मुली: तिसरी फेरी:
इरा जोशी (1गुण) वि.वि.समिधा साळुंखे (0गुण);
डेलिया खैरनार (0गुण)पराभुत वि.अन्वी हिंगे (1गुण);
7वर्षाखालील मुले: सातवी फेरी:
हियान रेड्डी (5गुण)पराभुत वि.गोरांक्ष खंडेलवाल(6गुण);
निवान अगरवाल(6गुण) वि.वि.आदित्य जगताप(4गुण);
मांतिक अय्यर (5गुण) वि.वि.श्लोक शिंदे (4गुण);
विहान शहा(5गुण) वि.वि.सनय गोखले(4गुण);
शिवम कायल (4गुण)पराभुत वि. अर्णव कांगो(5गुण);
9वर्षाखालील मुली: सहावी फेरी: व्हाईट व ब्लॅक या नुसार:
इरा बोहरा(5गुण)वि.वि.स्पृहा कमलापुरे(3.5गुण);
मिहिका बोले (5गुण) वि.वि.तेजस्वी गजभिये(3.5गुण);
स्वरा गांधी (3गुण) पराभुत वि.निधी खिंवसरा(5गुण);
समायरा चौधरी(3गुण)पराभुत वि. ईशिका डावरे (4गुण);
आरना बेलानी (3गुण) वि.वि.मान्या परमार (2गुण);
9वर्षाखालील मुले: आठवी फेरी:
विभोर गर्ग (6.5गुण) बरोबरी वि.आरिव कामत (6.5गुण);
अद्विक अग्रवाल (6.5गुण) बरोबरी वि. क्षितीज प्रसाद (6.5गुण);
राघव पावडे (6गुण) बरोबरी वि. कविश लिमये (6.5गुण);
ईशान अर्जून पीवाय (5गुण) पराभुत वि. नैतिक माने (6.5गुण);
संभव कांकरिया (5गुण) पराभुत वि.सर्वज्ञ बालगुडे (6गुण).

Leave a Reply

%d bloggers like this: