ज्यांना रताळे आणि बटाटे याचा फरक कळत नाही त्यांनी पायरी सांभाळून वागावे; आशिष देशमुख यांच्यावर रोहन सुरवसे पाटील यांचा घणाघात
पुणे : समाजकारण आणि राजकारण याची व्याख्या तर लांबचा विषय पण ज्यांना रताळे आणि बटाटे यामधील फरक कळत नाही त्यांनी आमचे नेते नाना साहेब पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी करूच कसे शकतात.असा प्रश्न उपस्थित करत प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आशिष देशमुख यांचा प्रसार माध्यमांशी बोलताना खरपूस समाचार घेतला.
पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना साहेब पटोले यांचे कर्तुत्व मोठे आहे. कर्तृत्ववान प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्याचा ठसा देशभर उमटला आहे. आता पर्यंत त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्याला अधिक महत्व दिले आहे.जनतेचे हित आणि जनतेचा विकास हा त्यांनी घेतलेला ध्यास आहे.ते पदासाठी राजकरणात नाहीत तर जनतेच्या विकासासाठी राजकरणात आहेत.याचे भान आशिष देशमुख यांना असावे.कारण ते भान हरपून वागत आहेत.
आजवर देशमुख यांनी वेगवेगळी स्टेटमेंट देत तोंडाची वाफ बाहेर काढली आहे आणि हा त्यांचा निव्वळ बिनभांडवली धंदा आहे.प्रकाश झोतात येण्यासाठी सतत चमकोगिरी करणे हे देशमुख यांचे नित्याचे बनले आहे. महाराष्ट्र् बर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा असो,वेगळ्या विदर्भाची मागणी असो किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवने असो, आपल्याच पक्षातील नेत्यांचा राजीनामा मागणे अशा चमकोगिरी करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र् काँग्रेस चांगल्या आणि योग्य प्रकारे काम करत आहे. त्यामुळे नाना पटोले यांचा राजीनामा मागण्यापॆक्षा आशिष देशमुख यांनी स्वतः पक्षातून बाहेर पडलं पाहिजे.कारण ते पक्षविरोधीच काम करत आहेत.
याआधीही काँग्रेस पक्षाने केंद्रीय समितीने पाठवललेल्या उमेदवाराला विरोध करायचं काम त्यांनी केलं आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिल्यांनतर त्यांनी पक्षाचा पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतरही ते पक्षात कसं काम करत आहेत. असा आमचा त्यांना सवाल आहे.
त्याआधी मागच्या वर्षी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी थेट भाजपच्या उमेदवारचा प्रचार केला होता. त्यावेळी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या हाकलपट्टीची मागणी केली होती. आज पुन्हा आम्ही त्यांच्या हाकलपट्टीची मागणी करत आहे, असे प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
