fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsSports

३१७ पदकांसह पुण्यास सर्वसाधारण विजेतेपद, ठाणे संघ उपविजेता

ऋषभ दास व श्रद्धा तळेकर सर्वोत्कृष्ट खेळाडू
पुणे–यजमान पुणे जिल्हा संघाने ११६ सुवर्ण, ९६ रौप्य व १०५ ब्रॉंझपदके अशी एकूण ३१७ पदके मिळवीत राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. ठाणे संघाने ४७ सुवर्ण ३४ रुपये व ३७ ब्रॉंझपदके जिंकून उपविजेतेपद मिळविले. ठाण्याचा ऋषभ दास (जलतरण) व पुण्याची श्रद्धा तळेकर (जिम्नॅस्टिक्स) यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला
शिवछत्रपती क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारोप समारंभात विभागीय आयुक्त सौरभ राव, पी एम आर डी ए चे आयुक्त राहुल रंजन महिवाल, स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे खजिनदार सहदेव यादव, महाराष्ट्र बँकेचे सर व्यवस्थापक राजेश सिंग, राज्याचे क्रीडायुक्त डॉक्टर सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
श्री राव यांनी सांगितले,” शासन खेळाडूंसाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असते. त्याचा लाभ घेत व सर्वोच्च ध्येय ठेवीत देशाचे नाव उंचवावे हीच आमची अपेक्षा आहे. अशा क्रीडा स्पर्धांमधून ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू होतील अशी मला खात्री आहे. त्याकरिता खेळाडूंच्या पालकांचे योगदानही महत्त्वाचे आहे. “येथील क्रीडा संकुलात पुढील वर्षी जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेचे आयोजन केले जाईल असे सांगून श्री. यादव म्हणाले जर भविष्यात भारताला ऑलिंपिक स्पर्धांचे यजमानपद मिळाले तर ती स्पर्धा पुणे शहरातच होईल असा आमचा प्रयत्न राहील. खेळाडूंनी उत्तेजक सेवनाचा मार्ग न स्वीकारता प्रामाणिकपणे कष्ट करीत यश मिळवावे.

डॉक्टर दिवसे यांनी प्रास्ताविक केले. श्री. राहुल महिवाल यांनीही यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन केले. श्री शिरगावकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading