Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत क्रिसेंट एफसी, बगिरा एफसी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश 

 पुणे : गुरू तेगबहादुर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत क्रिसेंट एफसी, बगिरा एफसी या संघांनी अनुक्रमे ईगल एफसी व सीएमएस फाल्कन्स अ या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सीओईपी फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या लढतीत क्रिसेंट एफसी संघाने ईगल एफसी संघाचा सडनडेथमध्ये 8-7 असा संघर्षपूर्ण पराभव करून दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. सामन्यात सुरेख सुरुवात करणाऱ्या क्रिसेंट एफसीच्या कौस्तुभ देशमुखने 5व्या मिनिटाला ओंकार गलांडेने दिलेल्या पासवर गोल करून संघाचे खाते उघडले. पिछाडीवर असलेल्या ईगल एफसीच्या खेळाडूंनी जोरदार चढाया केल्या. अखेर 25व्या मिनिटाला क्रिसेंट एफसीच्या ओंकार गलांडेने अवैधरित्या उमेश पाडमुळेला डीमध्ये असताना पाडले. त्यामुळे पंचांनी ईगल एफसीला पेनल्टी बहाल केली. मिळालेल्या संधीचे सोने करत उमेश पाडमुळेने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. पूर्वार्धात हि बरोबरी कायम होती. उत्तरार्धात देखील दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला व त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
टायब्रेकमध्ये क्रिसेंट एफसीकडून कौस्तुभ देशमुख, रेहान सय्यद, तनिश गायकवाड, इरफान सय्यद यांनी तर , ईगल एफसीकडून वैभव मस्के, मूनिकेश गुप्ता, उमेश पाडमुळे, अमोल वागस्कर यांनी गोल केले. टायब्रेकरमध्ये देखील बरोबरी झाल्यामुळे सडनडेथमध्ये सामना खेळविण्यात आला. सडनडेथमध्ये क्रिसेंट एफसी कडून गौतम उबाळे, साई शिंदे, अर्जुन पाठारे यांनी गोल केले. तर ईगल एफसीकडून योगीराज सपकाळला गोल मारण्यात अपयश आले.
दुसऱ्या सामन्यात नीरज भट, आदित्य सिंग, जय कांबळे याने नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर बगिरा एफसी संघाने सीएमएस फाल्कन्स अ संघाचा 3-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
क्रिसेंट एफसी: 5(कौस्तुभ देशमुख 5मि.(पास-ओंकार गलांडे), कौस्तुभ देशमुख, रेहान सय्यद, तनिश गायकवाड, इरफान सय्यद)(गोल चुकविले:-आयुश राजपुत)टायब्रेकरमध्ये बरोबरी वि.ईगल एफसी: 5(उमेश पाडमुळे 25मि.(पेनल्टी), वैभव मस्के, मूनिकेश गुप्ता, उमेश पाडमुळे, अमोल वागस्कर)(गोल चुकविले:- प्रविण भुजबळ); पूर्ण वेळ:- 1-1; टायब्रेकर: 4-4;
क्रिसेंट एफसी: 3(गौतम उबाळे, साई शिंदे, अर्जुन पाठारे) सडनडेथमध्ये वि.वि.ईगल एफसी: 2(अली शेख, जीत परदेशी)(गोल चुकविले:-योगीराज सपकाळ);
बगिरा एफसी: 3(नीरज भट 10मि.(पास-सोनू नेगी), आदित्य सिंग 25मि.(पास-राजेश थापा), जय कांबळे 52मि.(पास-ऋषभ सिंग)वि.वि.सीएमएस फाल्कन्स अ: 1(विकी राजपुत 35मि.(पास-रोहित भोकरे).
प्रौढ गट: 
आकतसुखी: 5(आटिन शेख 3मि.(पास-केरथ फर्नांडिस), आटिन शेख 10मि.(पास-केरथ फर्नांडिस), सुरेश सावंत 20मि.(पास-विक्रम बोरसे), शनूप नायर 40मि.(पास-अभिजीत शिंदे), प्रशांत ससाणे 45मि.(पास-राजीव राज)वि.वि.संडे वेतरन: 1(सुदर्शन 35मि.(पास-अमित गोकरे).
उपांत्य फेरीचे(14 जानेवारी 2023रोजी)सामने:
क्रिसेंट एफसी वि.खडकी युनायटेड 2.30वाजता;
बगिरा एफसी वि.अमर एफसी 4 वाजता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading