fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

सभासदांची नावे मतदार यादीतून वगळण्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अनेक सभासदांची नावे मतदार यादीतून वगळल्याबद्दल मेघराज राजेभोसले यांच्यामार्फत माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. 

महामंडळाचे वर्ग ब सभासदत्व तीन वर्षे धारण केल्यानंतर महामंडळाचे सभासदत्व वर्ग अ धारण करता येते. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सभासदांनी वर्ग ची सभासदत्व प्राप्त केले आणि अशा प्रकारचे ओळखपत्र देखील संस्थेकडून त्यांना बहाल करण्यात आले. या सभासदांनी वर्ग अ सभासत्वाचे शुल्क देखील वेळोवेळी संस्थेस देऊ केले. परंतु होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये असे झालेल्या मतदारयादीत त्यांचे नाव कोठेही नमूद नसल्याने त्यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे हरकती दाखल केल्या होत्या. त्यास अनुसरून निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल दिला ज्यामध्ये केवळ कार्यकारणीच्या बैठकीमध्ये वर्ग अ सभासद्वाचा विषय कार्यक्रम पत्रिकेवर न घेतला गेला असल्याचे कारण पुढे करत सदरील सभासदांचा निवडणुकीचा आणि मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला.

या निर्णयाविरुद्ध नाराज सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात अँडव्होकेट युवराज नरवणकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि मा. न्यायमूर्ती दिघे यांच्या खंडपीठाकडे होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading