fbpx
Sunday, May 26, 2024
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

‘वेड’ मोडणार ‘सैराट’ चा रेकॉर्ड?

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या जोडीच्या ‘ऑन स्क्रीन’ केमेस्ट्रीने तमाम महाराष्ट्राला अक्षरशा ‘वेड’ लावलय. वेड ने बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग तर मिळवलीच शिवाय सामान्य प्रेक्षकांपासून चित्रपट समीक्षक आणि राजकीय नेत्यांची वाहवाहा ही मिळवलीये.

वेड हा चित्रपट साऊथच्या ‘मजली’ या चित्रपटाचा रिमेक असला तरी रितेश देशमुखने याला perfect मराठी टच दिला आहे. अन् यामुळेच हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना अधिक भावतोय. या चित्रपटातील जिनीलियाचे अस्खलीत मराठी बोलण अन् रितेशच दिग्दर्शन प्रेक्षकांवर छाप पाडत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीमध्ये स्थान मिळविलय. रितेशच्या ‘लय भारी’ या पहिल्या मराठी चित्रपटचा पहिल्या आठवड्यातील 17 कोटी 10 लाख कामाईचा रेकॉर्ड ब्रेक करत ‘वेड ने 20 कोटी 67 लाख रुपयांची दमदार कमाई केलीये. दुसऱ्या आठवड्यात ‘वेड’ चित्रपट ‘लय भारी’ च्या 35 कोटी कामाईचा विक्रम मोडेल यात शंका नाही. तसेच आता ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या 40 कोटी कामाईचा विक्रम किती दिवसात मोडणार यांची उत्सुकता लागली आहे, असे झाल्यास ‘वेड’ हा सर्वाधिक कमाई करणारा मराठीतील दूसरा चित्रपट ठरेल.

‘वेड’ ची ही घोडदौड पाहता समस्त महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सत्या आणि श्रावणी ची ही जोडी नागराज मंजुळेच्या आर्ची – आणि परश्या ला मागे टाकत सैराटचा शंभर कोटी कामाईचा रेकॉर्ड तोडणार का? हे पहावे लागेल.

दरम्यान, अजय – अतुल यांचे अप्रतिम संगीत लाभलेल्या या वेड ची निर्मिती मुंबई फिल्म कंपनीने केलीये. वेड या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश सोबत अभिनेत्री जिया शंकर, अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तवडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading