Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप कटीबद्ध

पुणे:अभाविप ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे जी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करते. आय. आय.एस.ई.आर, पुणे (IISER, PUNE) येथील विद्यार्थीनी कु. गरिमा अगरवाल याची शैक्षणिक फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली. प्राध्यापकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. या विषयात आरोपीविरोधात कडक कारवाई व्हावी व विद्यार्थिनीला न्याय मिळवून द्यावा यासाठी अभाविप चे सातत्याने प्रयत्न चालले आहेत.

गरिमा अगरवाल ने मागील ६ वर्ष खडतर अभ्यास करून तिचा पीएचडी चा शोध कार्य पूर्ण केले. परंतु, पीएचडी मार्गदर्शकाने (प्राध्यापक) तो शोध एका दुसऱ्या विद्यार्थिनीच्या नावाने जमा केला. प्राध्यापकांकडून विद्यार्थिनीला इतका नाहक त्रास सहन करावा लागला, त्यापुढे जाऊन तिने केलेल्या तक्रारी ला दाद न दिल्याने व सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून गरीमाने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेवरती अभाविप ने आक्रमक पाऊल उचलत

विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्याच्या हेतूने ठीक ठिकाणी निवेदने दिली. ज्या शिक्षण पद्धतीचा विद्यार्थी हा अविभाज्य भाग असतो, त्या शिक्षण पद्धतीत हे असे क्रूर प्रकार घडणे फार निंदनीय आहे. प्राध्यापक जे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतात, त्यांच्या कडून हे भयावह कृत्य घडणे ही फार वाईट परिस्थिती आहे. या गोष्टी थे गाभीर्य लक्षात घेत अभाविप ने या विषयाला घेऊन आक्रमक भूमिका घेतली आहे. या विषयावर सर्वांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप कटीबद्ध आहे असे वक्तव्य अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यानी केले आहे. तसेच आजच्या पत्रकार परिषदेत “शिक्षणाचे बाजारीकरण होऊ देणार नाही” असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading