गौतमी पाटील गाजवणार आता ‘बीगस्क्रीन’
कालपरवा पर्यंत कोणालाही ठाऊक नसलेली लावणी नृत्यांगना गौतमी पाटील एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रकाशझोतात आली अन् रातोरात सोशल मीडिया स्टार झाली. अनेकदा तिच्या नृत्यामुळे, नऊवारीच्या स्टाईलमुळे तर कधी तिच्या नावाने सुरू झालेल्या डिशमुळे ती चर्चेत असते. आता आपल्या लावणी अदाकारीने स्टेज गाजवणारी गौतमी पाटील लवकरच ‘बीग स्क्रीन’वर झळकताना दिसणार आहे.

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘घुंगरु’ असे आहे. महाराष्ट्रात सोलापूर, माढा तर कर्नाटकातील हंपी या ठिकाणी याचे शूटिंग झाले असून; परदेशात थायलंडमध्येही या चित्रपटाचं चित्रीकरणही पार पडलं आहे. बाबा गायकवाड यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि लेखन केले आहे.

दरम्यान, अश्लील नृत्य सादरीकरणावरून गौतमी पाटीलला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र माफीनाम्या नंतर गौतमी अधीक प्रकाशझोतात आली. राज्यात अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम होवू लागले. इंतकेच नव्हे तर सोलापूरातील टेंभूरनी येथील एका हॉटेलमध्ये तिच्या नावाची थाळी देखील आहे. अन् आता लवकरच ती सिनेमातही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
