ऐतिहासीक स्मारकाच्या श्रेयाचे वातावरण डागळण्यासाठीच भाजपची आदळआपट – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : श्रीमंत छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचे जीवन चरीत्राचा येणाऱ्या पिढयांना आदर्श सांगणारे, २६९ कोटी रू खर्चुन ऊभे रहाणारे भव्य स्मारकाची मुळ कल्पना, तरतुद व आवश्यक भुमि संपादन इ कार्यवाही ही पुर्विच्या ‘महाविकास आघाडी सरकार’चे काळात सुरू झाली. ही वास्तवता पचनी पडत नसल्यानेच व मविआ’स हे श्रेय मिळु नये म्हणूनच मविआ नेत्यांविषयी दिशाभूल करणारी भाजपची आदळआपट सुरू झाली असल्याची टिका काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
वास्तविक तत्कालीन मविआ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मार्च २०२२ मध्येच २२-२३ चा अर्थ-संकल्प हा ‘हिंदवी स्वराज्य रक्षक’ श्रीमंत छत्रपती संभाजी राजे यांना समर्पित करण्याची महान भावना स्पष्ट करत, सुरवातच, २६९ कोटी रूपये खर्च करून वढू (बु) जिल्हा पुणे येथे त्यांचे ऐतिहासीक १ल्या स्मारक बांधण्याची व त्यांचे नांवे शौर्य पुरस्कारांची धोषणा त्याच वेळी केली. परंतु हिंदूत्वाचे दिखाऊ ठेकेदार असण्याऱ्या भाजपला हे पचनी पडेना..! त्यामुळे राजकीय_घरफोडी करून सत्तेवर आलेल्या, राज्यातील भाजपने शब्दछल करून, कुरापती काढून मविआचे व राष्ट्रवादीचे नेते मा अजीतदादा हे कसे महाराजांचा अवमान करीत आहेत हे भासवण्याच्या प्रयत्नात, श्री छ संभाजीमहाराजांच्या ‘मुळ स्मारक उभारण्याच्या ‘महाविकास आघाडी सरकारच्या श्रेयाचे वातावरण काळवंडण्याचा’ निष्फळ प्रयत्न भाजप करीत आहे..!
मा अजीतदादा हे विधान सभेत संभाजी महाराज स्मारका विषयी मविआ काळातील संकल्पना ते नियोजन विषयी अपडेट देतांना जर काही आक्षेपार्ह बोलले असतील… तर त्याच वेळी भाजप आमदार व नेत्यांनी सभागृहात हरकत का घेतली नाही..?.. मात्र ऊशीराने व पश्चातबुध्दीने ‘वढू (बु) स्मारकाचे श्रेय’ मविआस मिळण्याच्या पार्श्वभुमीवर व याच हेतुने मा अजीतदादा विरोधी आंदोलने करून, ओढून ताणून – श्रेय डागाळायचा व श्रीमंत छ संभाजीराजें विषयी मविआ नेत्यांना कसा आकस होता, हे दाखवण्याचा आक्रस्ताळेपणात भाजप ऊधडा पडल्याचे टिका देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..!
