अंगणवाडीच्या मुलांना सर्वांगीण विकासाचे धडे.
पुणे- दीपक फौंडेशनच्या माध्यमातून अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना बौद्धिक, सामाजिक, भाषिक, शारीरिक विकास होण्यासाठी धडे देण्यात आले. दिपक फाउंडेशन पुण्यातील वस्ती वस्तीपातलीवरील नागरिकांसोबत त्यांच्या हिताचे कार्य करते. त्यासोबतच मुलांच्या पोषण आहार कसा असावा यांची माहिती व समुपदेशन करते. एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत प्रकल्प अधिकारी पी.जी. शिर्के, मुख्यसेविक कविता देसाई, ३१,३८ गुलाटेकडी अंगणवाडी सेविका श्वेता चौधरी, साबिया मोमीन, तेजस्वी बोराडे, डॉक्टर गणेश माने यांनी अंगणवाडीतील ० ते ६ वयोगटातील बालकांना,व पालकांना पोषण आहार बाबतीत मार्गदर्शन केले. बालकांचा विकास होण्यासाठी त्यांची उत्सुकता जाणून घेऊन त्यांच्या प्रत्येक समस्या व प्रश्न समजून घेणे यासाठी प्रयत्न करणे असे सांगितले. यावेळी दीपक फाउंडेशन च्या प्रकल्प समन्वयक आरती पाटील, समुपदेशक स्नेहल सरनाईक उपस्थित होत्या.