Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट नाही

पुणे :राज्यातील बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाचा हा निर्णय शिंदे -फडणवीस सरकारला धक्का मानण्यात येत आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, नाथाभाऊ खडसे यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्याचे फोन टॅपिंग केले होते. यानंतर फेब्रुवारी महिन्यात फोन टॅपिंग प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याचा शहर पोलिस तपास करत होते. परंतु, राज्यात सतातंर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो आज फेटाळून लावला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading