fbpx

राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या 49 व्या अभ्यासवर्गाचा शुभारंभ

नागपूर : राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या 49 व्या अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता नागपुरातील विधानपरिषद सभागृहात उद्घाटन करण्यात आले. हा अभ्यासवर्ग आगामी 27 डिसेंबर पर्यंत सुरू असणार आहे.

यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती डॉ नीलम गो-हे, नरहरी झिरवळ, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांसह विधिमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 49 वा संसदीय अभ्यासवर्ग 20 ते 27 डिसेंबर या कालावधीत विधानभवन, नागपूर येथे सुरू राहणार आहे. या अभ्यासवर्गात विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
त्यातंर्गत बुधवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळात विधेयकांचे महत्त्व व कार्यपद्धती तसेच विधिमंडळाचे विशेषाधिकार’ या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘विविध संसदीय आयुधे, विधिमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: