Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना अभिवादन

पुणे : – अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन, कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरुन समाजसुधारणेचे कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुण्यतिथी दिन कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संपन्न झाला.
मा. कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील सरस्वती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मा. प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी श्रीमती चारुशीला गायके, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, डॉ. पराग काळकर, डॉ. विलास आढाव, डॉ. अपर्णा राजेंद्र आदी मान्यवर तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading