रामभाऊ, तुम्हाला आमाचा नाद परवडणारा नाही; सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल
पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर भाजप नेते राम कदम यांनी इशारा दिला होता. यावरू आता सुषमा अंधारे यांनी राम कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राम कदम म्हणाले, की घरात घुसून मारू. रामभाऊ तुम्हाला आमचा नाद परवडणारा नाही. आम्ही भटके, बाबासाहेबांचे संविधान मानणारे आहोत. पण वेळ आल्यास पायाच्या दोन बोटांमधे दगड पकडून मागच्या मागे माणूस आऊट करण्याची ताकद आमच्यात असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे यांनी आक्रमक होत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज विरोधकांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. तेव्हा सुषमा अंधारे बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यपाल पदाबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पण, त्यावर बसलेली व्यक्ती आदराच्या लायकीची नाही. कोश्यारी हे राज्यपाल असल्याचे विसरत आहेत. जेव्हा जेव्हा ते महापुरुषांच्या बद्दल बोलले तेव्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवलेले नाही आणि ४० चुकार भावांनी देखील त्यांना थांबवले नाही.
उदयनराजे इथं येऊन (स्टेजवर) बोलतील असं वाटलं होतं, पण ते थांबले नाहीत. कदाचित महापुरुषांचा अवमान सहन न झाल्याने खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी तडकाफडकी गेले असतील. उदयनराजे वेळ प्रसंगी भाजपचा राजीनामाही देतील, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
आता प्रसाद लाड इतक्या लाडात आले की आमच्या डोक्यावर प्रसाद वाटायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृवात हे सुनियोजित षडयंत्र सुरू आहे. मोदींना जेव्हा खर्गे हे रावण म्हणले होते. तेव्हा ते आलामपणाहसाठी बोलण्यासाठी पुढे आले. भाजप किती दुटप्पी आहे याचे हे प्रमाण आहे. टीम देवेंद्र यांनी निंदाजनक ठराव मांडला नाही, अशी टीकाही अंधारेंनी केला आहे.
टीम देवेंद्र यांना सांगितले पाहिजे की आपल्या मंत्रिमंडळात जे मंत्री महिलांबद्दल वक्तव्य करतात ती महाराजांचा वारसा सांगणारी नाहीत. काल आपल्या नीतूने काहीतरी वक्तव्य केले आता नितेश, नीलू हे बालिश बुद्धीचे आहेत. उद्योग गुजरातला, मंत्री गुवाहटीला, गावं कर्नाटकात आणि आपण आज लाल महालात, असेही सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.