Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

आट्यापाट्या स्पर्धेत चुरशीच्या अंतिम सामन्यात लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी; विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड

पिंपरी  : पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्तपणे आयोजित जिल्हास्तरीय १७ वर्षीय मुली आट्यापाट्या स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जुनी सांगवीतील लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल संघाने देहू रोड येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलचा एक डाव राखून पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल संघाची विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लिटल फ्लॉवर स्कूलच्या संघातील रुद्राणी सूर्यवंशी, पायल राजपुरोहित, आर्या भोर, हर्षता पाटील, समीक्षा मांजरे, मानसी कांबळे, श्रावणी कुंभार, मानसी उंद्रे, नीलांजनी जगताप, तनिष्का कांबळे, दूर्वा गायकवाड, नम्रता राऊत, रेवती आचार्य या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
अरविंद एज्युकेशन सोसायटी अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव यांनी सर्व खेळाडू आणि मार्गदर्शक यांचे कौतुक करीत अभिनंदन केले. मुख्याध्यापिका नीलम पवार, पर्यवेक्षिका मनीषा पुराणीक, क्रीडा शिक्षक रामेश्वर हराळे, रायगोंडा माशाळे, अक्षय नाईक, भटू शिंदे, उदय फडतरे व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
तसेच जिल्हा क्रीडा हँडबॉल स्पर्धेत प्रशालेच्या मुलांच्या संघाने व मुलींच्या संघाने देखील तृतीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे डॅाजबॅाल स्पर्धेत १७ वर्ष मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading