Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

किमान G-20 अध्यक्षीय कारकिर्दित, मोदींनी खोटे बोलू नये.. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी


पुणे : रोटेशन नुसार’ भारता कडे आलेले G20 अध्यक्ष पदाचे कारकिर्दीत तरी पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकप्रचारात ‘देशात काँग्रेस मुळे गरीबी आली’….अशी खोटी विधाने करून, असत्य बोलून, देशाची प्रतिमा खराब करू नये असे आवाहन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. डॅा मनमोहनसिंग यांचे युपीए काळात भारत २१ व्या शतकातील आर्थिक महासत्ता होऊ घातलेला देश होता हे वास्तव सर्वश्रुत होते. देशाची सार्व. संपत्ती विकुन, आरबीआय गंगाजळी चा पैसा वापरण्याची इतिहासात प्रथम वेळ आणणाऱ्यांनी धादांत खोटे बोलणे हे निंदनीय असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे..! भारतास स्वातंत्र्य मिळाल्या नंतर, देशातील शिक्षण दर, कृषी उत्पादन, रोजगार ते विकास दर पर्यंत मोठी मजल गाठली असुन, पुर्वीच्या सरकारांचे यात वेळोवेळी भरीव योगदान आहे. पंतप्रधान मोदी मात्र विदेशात जाऊन, देशात वास्तवात नसलेल्या समस्या जाणीवपुर्वक मोठ्या करून सांगत असल्याचे व मोदी सत्तेत आल्यावरच त्या कमी झाल्याचे(?), तेथील भाषणात सांगताना दिसले आहे. “देशात शौचालये वा लाईट देखील नव्हती..असे धादांत खोटे सांगुन…”एक काळ होता.. जेंव्हा भारतीय असल्याचे सांगण्यास लाज वाटत असे(?)” अशी धक्कादायक व खेद जनक विधाने ही पंतप्रधान मोदी साहेबांनी विदेशात केलेली आहेत. निव्वळ पुर्वीच्या सरकारांना राजकीय दुषणे देण्याची त्यांची हौस ही देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब करीत आहे व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी होत आहे हे देखील त्यांना लक्षात कसे येत नव्हते(?) असा टिकात्मक संतप्त सवाल देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.. वास्तविक पाहता युपीए काळांत, दारिद्रय रेषे बाहेर आलेल्या देशातील जनतेची संख्या तब्बल २७ कोटींचे वर गेल्याचे प्रत्यक्ष आकडे व पुरावे रेकॅार्ड वर आहेत…
असे असतांना ‘काँग्रेस ने गरीबी वाढवली’ कोणत्या तथ्याच्या आधारे मोदी सांगतात..?
निव्वळ, पंतप्रधान असल्याने आपल्या विधानांना प्रसिध्दी मिळते याचा अर्थ काहीही भाकड कथा सांगाव्यात असा होत नाही, असे ही काँग्रेस ने दिलेल्या प्रसिध्दी पत्रात म्हंटले आहे..!
उलटपक्षी सामान्यांना भेडसावणारी प्रचंड महागाई, ४५ वर्षातील वाढलेला बेरोगारी दर, जीवनावश्यक वस्तुंचे काहीपटीं मध्ये वाढलेले दर व “२०१४ नंतर मोदी यांचेच काळात दारीद्र्य रेषेखाली गेलेली सु २३ कोटी जनतेची संख्या” हे सत्य-वास्तव कशाचे प्रतिक आहे (?) असा सवाल देखील काँग्रेसने केला..!
शौचालये, लाईट नसलेल्या व पंतप्रधान स्वतःच् गरीबी दर्शवीत असलेल्या देशात ‘कोणती आंतराष्ट्रीय गुंतवणुक येणार’(?) हे साधे धोरण ही विश्वगुरू होण्याचे स्वप्न बाळगणार्या मोदी व त्यांचे पक्षास लक्षात येत नाही हे देशाचे दुर्दैव असल्याची टिका ही काँग्रेस ने केली…!!
परंतू या ही परिस्थितीत देशातील जनतेस, खोट्या व तथ्यहीन विधानांमुळे भ्रमित होण्यापासून, निराशेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्या करीता, देशवासीयांचा विश्वास जागृत करून एकसंध विश्वासाच्या भावनेचा भारत ऊभा करण्या करीता, काँग्रेसनेते मा राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा चालली आहे व त्यास देशवासियांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.. अशी पुष्टी ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जोडली*..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading